Our Mission

Pratap Vyayamshala is a Social Welfare Organization dedicated to improving the lives of underprivileged individuals in our community. Through our various programs, we strive to address the educational, healthcare, and basic needs of those in need. Our mission is to create a positive impact and bring about lasting change in the lives of the marginalized. Join us in our journey towards a more equitable society.


Who We Are

"मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या म्हणीचा अर्थ प्रताप व्यायामशाळा सेवा संस्था या संस्थेस तंतोतंत लागू पडतो. १९५० साली लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचे ठाणेकर बंधू व भगिनी व इतर नागरिक यांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने आजच्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

एका छोटुश्या झोपडी वजा घरात सुरवातीस सुरू झालेली प्रताप बालमंदीर व भारतीय संस्कार आधारित व्यायामशाळा आज मोठ्या दिमाखात कै.वामनराव ओक रक्त केंद्र आपल्या चार मजली इमारतीत सामावून समाजाच्या इतर व तत्कालीन गरजेवर सतत कार्यरत आहे.

१९७३ मध्ये कार्याचा वाढता पसारा पाहता रीतसर धर्मादाय आयुक्त यांच्या दफ्तरी दि.२० फेब्रुवारी, १९७३ रोजी इ-४४५/ठाणे या क्रमांकाने नोंद.

बाई हळू हळू चला मुखाने मोरया बोला, तद्वत संस्था आपल्या कार्याने हळू हळू पण खंबीर पावले टाकत आज अभिमानाने कार्य करत आहे.

कोरोना -१९ महामारीत तर समाजातील सर्व गरजूंना अगदी तृतीयपंथी यांना सुद्धा धान्य वाटप, सामुदायिक अन्नछत्र , सुमारे अडीच लाख आयुर्वेदिक गोळ्यांचे वितरण करून आपल्या कार्यवर यशस्वीतेची मोहोर उठवली.

कालाय तस्मै नमः असे म्हणत समाजाच्या गरजेनुसार कार्यात बदल होत गेला पण हे करताना मूळ हेतू मुख्यतः बाल व तरुण यांना सृजन व सज्जन शक्तीचे महत्व पटवून देत देशासाठी एक सुसंस्कृत, कर्तृत्वान युवक घडण्यास हातभार लावला.

२०२३ पासून स्थलांतरित व विशेष करून अत्यंत तोकड्या रोजच्या जीवन सुविधा पण दाटीवाटीच्या अश्या वस्तीतील मुलांसाठी वस्ती विकास प्रकल्पा अंतर्गत संजीवनी पाठदान केंद्र चालू आहेत.

ही सर्व केंद्रे ठाणे येथील नौपाडा, ठाणे पूर्व, कळवा पूर्व व पश्चिम या ठिकणी आहेत. २०२३ साली एका पाठदान केंद्राने सुरवात करत ३० मार्च २०२६ अखेर एकूण २० पाठदान केंद्र असून ३७५ विद्यार्थी लाभ घेत आहेत. सर्व केंद्रे निःशुल्क चालवली जातात.

समाजातील दानशूर धुरीणांच्या सहकार्यमुळे हे सर्व शक्य होत आहे.

You agree to share information entered on this page with PRATAP VYAYAMSHALA SEVA SANSTHA (owner of this page), adhering to applicable laws.

Donate Now

Scan the QR code to pay instantly

Scan to pay instantly

GPay · PhonePe · Paytm · BHIM
pages.razorpay.com/pratapvyayamshala

Organisation Details

Pratap Vyayamshala Seva Sanstha – Thane

Registration No.: E-445 / Thane

Organiser: Mr. Mahesh Bhaskar Joshi

Primary Address: Basement, Ramshanti CHS Ltd, Ghantalidevi Road, Naupada, Thane West 400602.

Reg. Office: Sahyog Mandir Path, Ghantali, Naupada, Thane (E)

Get In Touch

pratapvyayamshala@gmail.com
98210 57938